Home
Home Breaking News महात्मा गांधी विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

महात्मा गांधी विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
राष्ट्रमाता जिजाऊ व करोडो युवकांचे प्रेरणा स्रोत स्वामी विवेकानंद यांची जयंती स्थानिक महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे होते,प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षक एच बी मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे होते.
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कु अर्शिया सिद्दीकी,व प्रणित मोहितकर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकला,संचालन व आभार प्रदर्शन प्रा नितीन वाढई यांनी केले.
याप्रसंगी प्रा नंदाताई भोयर, प्रा आरजू आगलावे, व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here