मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आसरे गावातील तरुणांचा सहभाग*

 

लोकदर्शन सातारा👉 -गुरुनाथ तिरपणकर

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातून आसरे गावातील तरुणांनी एक जीप गावातून व एक कार मुंबई पनवेल येथून आंतरवाली सराटी येथे १४ आॕक्टोबर २०२३ च्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी उत्स्पूर्तपणे मराठ्यांचे व जरांगे पाटलांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी उपस्थित राहिले. यात प्रामुख्याने शिक्षणासाठी व नोकरीसाठी आरक्षणाची अत्यंत गरज असून , मुलांना शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळत नसल्याने त्यांची नकारात्मकता वाढत आहे, त्यांना आरक्षण मिळाल्यास त्यांचा जिवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल. आरक्षण नसल्याने मराठा तरुणांची शिक्षणातील प्रवेश व नोकरीतील संधी थोडक्यात हुकत आहे. मग आलेल्या नैराश्यातून आत्महत्येची प्रवृत्ती वाढत चालली आहे. त्यात बदल करुन तरुण पिढीला सकारात्मक विचारांकडे आणणे गरजेचे असल्याने मनोज जरांगे पाटील यांचे विचार ऐकणे महत्त्वाचे होते. यात प्रामुख्याने प्रकाश सणस, सुरज कासुर्डे, अमोल जरंडे, संतोष सणस, चंद्रेश कासुर्डे, चंद्रकांत हगवणे, दीपक जेधे व कु. आदित्य येवले यांचा सहभाग होता. यासाठी कालिदास येवले व अमोल जरंडे यांनी खूप मेहनत घेतली, आसरे गावात आरक्षण विषयी जागृती वाढविण्यासाठी या तरुणांचा मोठा वाटा आहे. कु.आदित्य येवले हा तरुण ११ वी सायन्य मधे शिकत असून, त्याच्या उत्साहाचे व धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहै.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *