Home
Home Breaking News अल्ट्राटेक द्वारे ४० युवकांना वाहन प्रशिक्षण

अल्ट्राटेक द्वारे ४० युवकांना वाहन प्रशिक्षण

 

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर हे नजीकच्या गावांची सर्व स्तरावरील प्रगती व्हावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. या वाढत्या लोकसंख्येमुळे बहुतांश युवक बेरोजगार असतात त्यांना कुठेतरी आपल्या कौशल्यावरती रोजगार मिळावा याकरिता अल्ट्राटेक वेलफेअर फाऊंडेशनने गावातील ४० युवकांना वाहन प्रशिक्षण देण्याचे ठरविले विशेष म्हणजे त्या ४० युवकांमध्ये ०३ मुलींचा समावेश आहे. चंद्रपूर ड्रायव्हिंग स्कूल, चंद्रपूर यांच्या सहाय्याने ४० युवकांना वाहन प्रशिक्षण देऊन त्यांना टीआर परमनन्ट ड्रायव्हिंग फोर व्हिलर लायसन्स सुद्धा प्रधान करण्यात येणार आहे. या प्रशिक्षक शिक्षणाचा शुभारंभ अल्ट्राटेक सिमेंट वर्क्स, युनिट हेड, पी. एस. श्रीराम, यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला गौतम शर्मा, सौदीप घोष, संदीप देशमुख, ललित देवपुरा, कर्नल दीपक डे, सतीश मिश्रा, प्रशिक्षक उत्तम काळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वीतेकरिता सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी अथक प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here