शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मिळताच उरण मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष.

 

लोकदर्शन उरण👉१०विठ्ठल ममताबाद

उरण दि १०नोव्हेंबर 2022 शिवसेना नेते संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने शंभर दिवसानंतर सुटका केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांनी जल्लोष केला. शिवसेना उरण तर्फे सुध्दा गुरुवार दिनाकं ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना)पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उरण शहर शाखेजवळ फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.

यावेळी उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहर संघटक दिलीप रहाळकर, नगरसेवक अतुल ठाकूर, नगरसेविका वर्षा पठारे, माजी नगरसेवक निलेश भोईर, शहर संघटिका मेघा मेस्त्री, अल्पसंख्याक सेलच्या शहर अध्यक्षा मुमताज भाटकर, तालुका अध्यक्षा हुसेना शेख, विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, विभागप्रमुख संजय गावंड, शैलेश पंडित, अवजड वाहतूक सेनेचे चेतन म्हात्रे, धीरज बुंदे, युवासेनेचे नयन भोईर, संदेश पाटील, आशिष गोवारी, निखिल पाटील, संदीप पाटील,अरहम शेख, ग्राहक संरक्षण कक्षाचे अजय सुतार, संदिप जाधव, शाखाप्रमुख गुरुनाथ घरत, इस्माईल शेख, जेष्ठ कार्यकर्ते माणिक पाटील, नंदू पाटील, निजाय भाटकर, समीम खान, अरशद शेख, नबेल भाटकर, इम्रान खान, मोहम्मद शेख, शाहरुख गडी, हसीमा सरदार, रुक्सना सय्यद आदी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *