उरण विधानसभा मतदारसंघात भाजप ला खिंडार. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा करिष्मा माजी उपसभापती मधुमती गुरव व रेखा अपटेकर यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 4 नोव्हेंबर 2022
गुरुवार दिनाकं 03 नोव्हेंबर 2022 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे(शिवसेना )पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रायगड जिल्हाप्रमुख, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण विधानसभा मतदारसंघातील खालापूर तालुक्यातील भाजपच्या माजी उपसभापती मधुमती मनोहर गुरव व रेखा ज्ञानेश्वर अपटेकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.तसेच त्यांच्यासोबत तुपगावं,अली अंबिवली व मोहपाडा विभागातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सर्व कार्यकर्त्यांना भगवी शाल अर्पण करून शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, उपतालुकाप्रमुख रमेश पाटील, मनोहर देशमुख,माजी सरपंच महेश परीट,ग्रामपंचायत सदस्या रोहिणी विलास गुरव, सपना मनोज गुरव, स्वाती प्रकाश जाधव, संतोष पागत, अजीत भोईर, प्रकाश जाधव, ओंकार गुरव, दिलीप साळुंखे, मंदा गुरव, नम्रता गुरव,पूनम गुरव, वृषाली गुरव व सर्व आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *