मराठी चित्रपट टिमची जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट … !

लोकदर्शन 👉 राहुल खरात

प्रसिद्ध व्याख्याते व जेष्ठ साहित्यिक प्रा . सुनील दबडे यांच्या गोमेवाडी हिवतड येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील निवासस्थानी मराठी चित्रपटाच्या टिमने सदिच्छा भेट दिली .
यावेळी मुंबई येथील चित्रपट दिग्दर्शक महेश बनसोडे , सहाय्यक दिग्दर्शक प्रा . संताजी देशमुख , निलेश घुले , गणेश कोळी व पंचम फिल्मचे प्रसिद्ध बालकलाकार पार्थ जावीर उपस्थित होते .
यावेळी महेश बनसोडे यांचा प्रा . दबडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बुक देवून सत्कार करण्यात आला . उपस्थित सर्वांनाच पुस्तके भेट देवून चित्रपटासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
” चला हल्लाबोल ” . हा चित्रपट मराठी व हिंदी या दोन्ही भाषेत तयार करण्यात येणार आहे . त्या चित्रपटासाठी कलाकारांच्या ऑडिशन सांगली जिल्ह्मातील आटपाडी व अन्य ठिकाणी झालेल्या आहेत .
या चित्रपटाचे लोकेशन शोधण्यासाठी या टिमने आज २ नोव्हेंबर रोजी हिवतड , शुक्राचार्य व बाणूरगड येथेही भेटी दिल्या .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *