अभिनेत्री सिद्धी कामथ यांनी भेटवस्तू प्रदान करून वाढदिवस केला साजरा. .. !

लोकदर्शन मुंबई – 👉(प्रतिनिधी-राहुल खरात)

भाई शिंगरे ट्रस्ट मालाड, मुंबई या सेवाभावी संस्थेतर्फे प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी विनायक कामथ यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता केवळ सामाजिक बांधिलकी जपली जावी या हेतूने सिद्धी कामथ यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त तेथील कामगार आणि गरजू व्यक्तींना भेटवस्तू म्हणुन थर्मासचे वाटप केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री चंदनभाई शिंगरे, सिने-नाट्य दिग्दर्शक, पत्रकार महेश्वर तेटांबे, निर्माते सचिन पाताडे, विनायक कामथ आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचाच एक भाग म्हणुन त्याच दिवशी रात्रौ रविन्द्रनाथ नाटय मंदिर, प्रभादेवी येथे मुंबई एकी समूहा तर्फे देखिल सिद्धी यांचा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते विजय पाटकर आणि इतर कलावंत उपस्थित होते. हा वाढदिवस सोहळा यशस्वी करण्यासाठी मनिष मेहेर, पल्लवी पाटील आणि गणेश तळेकर यांचे विशेष योगदान लाभले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *