मराठवाडा मुक्ती संग्राम दिन*

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

सावित्रीबाई फुले विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय, , सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल गडचांदूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंदरावअडबाले, विशेष अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष तुळशीराम ता. पुंजेकर, शरदराव पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय कुमार सिंह, इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या खोडके मॅडम, विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे, पर्यवेक्षक संजय गाडगे, कला विभाग प्रमुख प्रा. खैरे, विज्ञान विभाग प्रमुख कु. ताकसांडे मॅडम, एम.सी.व्ही.सी. विभाग प्रमुख व्ही.जी. मुप्पीडवार, सेवा जेष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे उपस्थित होते.
ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आनंदरावजी अडबाले यांच्या हस्ते करण्यात आले.,तत्पुर्वी लोहपुरूष सरदार पटेल,व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी च्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राजेश वासेकर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *