शिक्षक पालक सभा संपन्न*

 

लोकदर्शन👉मोहन भारती

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे शिक्षक पालक संघाची सभा दिनांक 17 सप्टेंबर 2022 ला घेण्यात आली. सभेचे अध्यक्ष अध्यक्ष उन गुलाबराव राठोड होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य धर्मराज काळे पर्यवेक्षक संजय गाडगे डॉक्टर भूषण मोरे प्रवीण आडे प्राध्यापिका संडे सेवा जेष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे उपस्थित होते.
सभेमध्ये विद्यार्थ्याच्या शैक्षणिक सांस्कृतिक बौद्धिक विकास , गुणवत्ता पूर्ण शिक्षण यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली. या दृष्टीने विद्यालयाने विद्यार्थ्यांकरीता विषयाची काठीण्य पातळी लक्षात घेऊन जादा वर्ग घ्यावे अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांचे आरोग्य, वर्ग दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांचे निकाल उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून मान्यवरांनी तसेच शिक्षकांनी विचार व्यक्त केले.. शिक्षक पालक व विद्यार्थी या त्रिकोणाला साधल्याशिवाय विद्यार्थ्यांची सर्वांगीण उन्नती होणार नाही असा सूर सर्वच पालकांचा होता .तसेच डॉक्टर भूषण मोरे यांनी किशोरवयीन मुलांच्या व मुलींच्या बाबतीत पालकांनी घ्यावयाची काळजी याविषयी विशेष मार्गदर्शन केले. शिक्षक पालक संघाची गरज व महत्व प्रास्ताविकातून पर्यवेक्षक संजय गाडगे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन भुवनेश्वरी गोपंमवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता शिक्षक पालक संघाचे सचिव प्रा. डी. के. झाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. मेहरकुरे सर यांनी केले. सभेकरिता शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक वृंद उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *