Home
Home Breaking News गुरुकुल महाविद्यालयातील खेळाडू चमकले*

गुरुकुल महाविद्यालयातील खेळाडू चमकले*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,, गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथील खेळाडू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या क्रीडा व शिक्षण विभागाद्वारे आयोजित आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धे मध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले . दि. 16 ते 19/11/2022 या कालावधीमध्ये आयोजित कबड्डी स्पर्धेत गुरुकुल महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. आशिष पईनकर यांच्या मार्गदर्शन अंतर्गत कुणाल रासेकर, सौरभ मेश्राम, आकिफ शेख, सौरभ बोरकुटे, आदित्य थोरात, साहिल कन्नाके, सुजल नागपुरे, जय चोपने, किरण गिरे, यश आंबेकर, आदित्य निखार व रोहन गायकवाड या विद्यार्थ्यांनी कबड्डी क्रीडा स्पर्धेत यश प्राप्त केले.गोंडवाना विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे सर व शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अनिता लोखंडे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाकरिता वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुनिता ताई लोढिया, सचिव डॉ. अनिल मुसळे, संस्थेचे इतर पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढे होणाऱ्या स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here