वंजारी सेवा संघ नागपूरची त्रैमासिक सभा थाटात संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नागपूर-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वंजारी सेवा संघ महाराष्ट्र द्वारा संचालित वंजारी सेवा संघ नागपूरची त्रैमासिक सभा दि.12 नोव्हेंबर 2022 रोजी श्री नरेन्द्र धात्रक (कोषाध्यक्ष, पूर्व विदर्भ),26, जोशी वाडी नागपूर यांचे राहते घरी नागपूर जिल्हा वंजारी समाज कार्यकारिणीची सभा संपन्न झाली.
या सभेत नागपूर येथील वंजारी समाज भवनात समाजाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा, चंद्रपूर येथे वंजारी समाजाच्या मेळाव्यास उपस्थितीबाबत, जिल्हा अध्यक्ष व कार्यकारिणीचे लेटरहेड निर्मितीबाबत, तसेच डॉ मंजुषाताई दराडे(वंजारी सेवा संघ महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते महिला आघाडी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री उत्तमराव नव्हाते, श्री अरुण मुंढे, सौ माधुरी अरुण मुंढे या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण डॉ. मंजुषाताई दराडे यांचे हस्ते करण्यात आले. ही सभा श्री शेषराव खारडे यांचे अध्यक्षतेखाली, डॉ.मंजुषाताई दराडे यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच श्री राहुलजी जाधवर(संस्थापक अध्यक्ष वंजारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य) यांचे प्रमुख मार्गदर्शनात पार पडली.
यावेळी श्री दीपक कहुरके, प्रा. शिवानंद कापडी, प्रा. सतीश करपे, सौ. माया वराडे, सौ कविताताई धात्रक ,श्री शेखर धात्रक, डॉ. प्रा. सौ. सुरेखाताई वराडे, सौ. जयश्रीताई धात्रक, प्रा. राजीव धात्रक, श्री अरुण मुंढे, सौ. माधुरी मुंढे आदि सदस्यगण उपस्थित होते.
सभेच्या यशस्वीतेसाठी सर्व सदस्यांनी अथक प्रयत्न केले.
,,फोटो,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here