झरे महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात संपन्न

 

लोकदर्शन आटपाडी👉 राहुल खरात

महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्यु. सोसायटी सांगलीच्या पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविदयालय, झरे. मध्ये 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान हिंदी सप्ताह साजरा करण्यात आला या मध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,भित्ती पत्रक स्पर्धा, शेरो शायरी, काव्य वाचन स्पर्धा आदी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला हिंदी दिन समारोह कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. भारती देशमुखे कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी यांना आमंत्रित करण्यात आले होते हिंदी भाषा आपला स्वाभिमान आहे हिंदी मध्ये अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत म्हणून आणि आपली राष्ट्रीय अस्मिता म्हणून हिंदी आपण बोलली पाहिजे तिचा प्रचार व प्रसार केला पाहिजे असे मत त्यांनी कार्यक्रमात मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देवेंद्र देवकुळे हिंदी विभाग प्रमुख यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्र. प्राचार्य. पाटील आर. एच. यांनी भूषवले कार्यक्रमाचे आभार प्रा. समीर मुलाणी सर यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here