अखिल भारतीय नाथपंथी महासंघ आणि नाथमुद्रा बचत गट यांच्यावतीने नवनिर्वाचित बीड जिल्हा युवा अध्यक्ष श्री भैरवनाथ शिंदे सर यांचा सत्कार*

 

लोकदर्शन👉 राहुल खरात

बीड-वडवणी येथील अतिशय कष्टाळू सतत समाजासाठी धडपड करणारे समाज संघटित करणारे समाजासाठी धावून जाणारे प्रभावी व्यक्तिमत्व माननीय भैरवनाथ शिंदे सर वडवणी यांची बीड जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून महासंघाच्या वतीने मराठवाडा युवा अध्यक्ष माननीय डॉक्टर सुरवसे माननीय डॉक्टर पैठणकर तसेच ह भ प भरत महाराज जोगी परळी माननीय भरत चव्हाण माजी गटविकास अधिकारी बीड जिल्हा अध्यक्ष केदारनाथ चव्हाण सर प्राध्यापक बालकनाथ यादव सर जयश्रीताई चव्हाण मुख्याध्यापक संजय सावंत सर या सर्वांनी एकमताने त्यांची निवड केली आहे पुढील कार्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महासंघातील सर्व पदाधिकारी तसेच बचत गटातील सर्व सदस्य व असंख्यनाथ बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होता तसेच या कार्यक्रमाचे आयोजन बीड जिल्हा सचिव श्री हरिभाऊ भराडी बीड जिल्हा संपर्कप्रमुख रंगनाथ पैठणकर तसेच दत्ता शिराळकर अक्षय बामणे उत्तम पांचाळ तसेच सर्व नाथ बांधव तालुका अध्यक्ष सदस्य हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. माननीय शिंदे सर यांनी सत्काराला उत्तर देताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व नाथ बांधवांच्या सहकार्याने आपला समाज संघटित होण्यासाठी मी कार्य करणार आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गणेश शिंदे यांनी केले व नाष्टा चहापाणी नंतर कार्यक्रम संपला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here