वेळेत उपचार न मिळाल्याने सापाचा मृत्यू.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २१.नोव्हेंबर.2022 … दि. २१.११.२०२२ रोजी सकाळी ११ वा १८ मीनिटांनी साप वाचवण्यासाठी सर्पमित्र समिर कृष्णा म्हात्रे (गव्हाण जासई विभागध्यक्ष, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था उरण ) ह्यांना कॉल आला.समीर म्हात्रे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन ब्लू स्टार कंपनीच्या बाजूला मक्याच्या गोदामसमोरील भागात घोणस जातीचा विषारी साप मातीच्या ढीगाऱ्यात अडकला होता.११वा ४०मीनिटांनी त्या सापाला रेस्क्यू केले.आणि पाहिले असता त्या सापाला ढीगाऱ्यात अडकल्यामुळे इजा झाली होती. २ मोठ्या जखमा होत्या त्यातून त्या सापाचा रक्तस्त्राव चालूच होता.
त्याला तात्काळ उपचाराची गरज होती म्हणून त्या सापाला परळ किंवा पुणे येथील रुग्णालयात न्यायची गरज होती. सर्पमित्र समिर ने उरण वनअधिकारी धांडे ह्यांना भ्रमनध्वनी द्वारे संपर्क साधला.त्यांनी वनअधिकारी म्हात्रे ह्यांच्याशी बोलणे करायला सांगितले. परत वनअधिकारी म्हात्रे ह्यांच्याशी भ्रमनध्वनी द्वारे संपर्क साधला. त्यांनी वनअधिकारी इंगोले ह्यांच्याशी बोलणे करायला सांगितले,
वनअधिकारी इंगोले यांच्याशी भ्रमनध्वनी द्वारे संपर्क साधला तर ते म्हणाले की ते सुट्टीवर आहे मग नाईलाजास्तव पुन्हा वनअधिकारी म्हात्रे ह्यांच्याशी भ्रमनध्वनी द्वारे संपर्क साधला पण त्यांचीही उत्तरे निष्फळ ठरली.कुठल्याही वनअधिकाऱ्याने वेळेवर आपले काम बजावले नाही.तसेच कुठलीही मदत देखील केली नाही. तब्बल २ तासानंतर तो साप मृत झाला.शासकीय अधिकारी, वनअधिकारी यांचा वेळेत योग्य प्रतिसाद न मिळाल्याने एका मुक्या प्राण्याचा नाहक बळी गेला. त्या सापावर वेळेत उपचार झाला असता तर ते साप नक्की वाचले असते अशी प्रतिक्रिया सर्पमित्र समीर म्हात्रे यांनी दिली.

सर्पमित्र स्वतःचे जीव धोक्यात घालून साप वाचविण्याचा प्रयत्न करतात परंतु वनअधिकाऱ्याच्या / शासनाच्या भोंगळ कारभारमुळे आणि कामचुकार पद्धतीमुळे वन्यजीवांचे मरण होते.याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

दरवर्षी बेलपाडा – गव्हाण डोंगराला आग लावली जाते, कितीतरी वन्यजीव होरपळून मारतात पण अजूनही त्यावर काहीही उपाय केलेलं दिसत नाही.याबद्दल सर्पमित्रांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *