लसाकम तर्फे गडचांदूर येथे क्रांतिवीर लहुजी साळवे जयंती साजरी*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
लहुजी साळवे कर्मचारी महासंघ संघटना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने क्रांतिवीर सत्यशोधक लहुजी साळवे यांची 228 वी जयंती गडचांदूर येथे 20 नोव्हेंबर ला साजरी करण्यात आली, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ विचारवंत जी एस कांबळे होते तसेच उद्घाटक माधव सूर्यवंशी होते, प्रमुख अतिथी लसाकम चे जिल्हा संयोजक डॉक्टर कुलभूषण मोरे, अंकुश काकडे , बसवंते , जाधव , उत्तम गायकवाड , गायकांबळे , राजपांगे , गोटमुकले , संजय मोरे , देविदास कांबळे , भोगे , गायकवाड , उपस्थित होते . याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक कांबळे यांनी क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या कार्यावर विस्तृत मार्गदर्शन केले तसेच इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर कुलभूषण मोरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन जिल्हा संयोजक यशवंत बसवंते यांनी केले …
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *