भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात चौदा ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन*

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

रक्तदान हेचं जीवनदान हे ब्रीद मानून सलग १८ व्या वर्षी घुग्घुस येथील गांधी चौकात सोमवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त देवरावदादा भोंगळे मित्र परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प, इंदिरा नगर, वरोरा, भद्रावती, बीबी, कोरपना, राजुरा, बल्लारपूर, चंदनखेडा, जिवती, गोंडपिपरी, तोहगाव, चिंतलढाबा याठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील वर्षी १७५३ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून विक्रम केला होता. मागील १७ वर्षांपासून घुग्घुसमध्ये उपक्रम राबविण्यात येत आहे.

घुग्गुस येथील शिबिरातून ४०० बॅग रक्तपुरवठा दंगलग्रस्त अमरावती शहराला पाठवण्यात आल्या होत्या. या वर्षी नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली व अहेरी येथील शासकीय रक्तपेढीला रक्तपुरवठा करण्यात येणार आहे.

रक्तदान शिबिराला मोठया संख्येत नागरिकांनी उपस्थित राहावे व रक्तदान करून देशसेवा करावी असे आवाहन आयोजक देवरावदादा भोंगळे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *