पांढरकवडा येथील भीषण अपघातात* *गडचादुरातील पतिपत्नी* **ठार*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*गडचांदूर :*
नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर पांढरकवडा नजीकच्या कारंजी गावा जवळ झालेल्या भीषण अपघात गडचांदूर येथील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली.
ट्रक आणि मोटरसायकलच्या जोरदार धडकेत मोटरसायकलवर असलेले पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत.

नागपूरकडून हैदराबादकडे जाणारा ट्रक क्रमांक युपी.९२टी.३५६९ व गडचांदूर येथील मोटरसायकल क्रमांक एम. एच. ३४ बी. एक्स. ६७३९ यांचा भीषण अपघात झाला. दरम्यान या अपघातात मोटरसायकलवर जात असलेले गोकुळदास लांडगे (वय ५०) सुनिता गोकुळदास (वय ४५) रा .वार्ड क्र. 6 या दोघा पती-पत्नीं जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरतात नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलिस करत आहे.

घटनेची वार्ता गडचांदूर शहरात पोहचताच पतिपत्नीच्या झालेल्या अपघाताबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *