माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांचा योग्य निर्णय ♦️आटपाडीची यात्रा देशाचे आकर्षण ठरावे .

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

समस्त आटपाडी तालुका वाशीयांच्या भावनांची दखल घेणारा ,आटपाडीची यात्रा आटपाडी च्या ओढा पात्र परिसरात भरविण्याचा खुप सुंदर आणि अत्यावश्यक निर्णय *माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी घेतला . त्याबद्दल त्यांचे तसेच त्यांना साथ देणाऱ्या सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन.*
शेळ्यामेंढ्याचा शनिवारचा आठवडा बाजारही पूर्ववत आटपाडीच्या ओढापात्रातच भरवून हजारो तालुका वाशीय शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, गावकरी नागरीक बंधू भगिनींच्या भावनांची कदर केली जावी . आटपाडीच्या श्री . उत्तरेश्वराच्या यात्रेस येणाऱ्या भावीक, भक्त, यात्रेकरू, व्यावसायीक उद्योजक शेतकरी कष्टकरी नागरीक बंधू भगिनींचे मनःपूर्वक स्वागत . माझ्या लहानपणी भरणारी आटपाडीची, भव्य – दिव्य – प्रचंड यात्रा हे स्वरूप हळू हळू या यात्रेला यावे . ही यात्रा येथे येणाऱ्यांसाठी पर्वणी ठरावी . शेकडो लहान लहान व्यापाऱ्यांना आनंद मिळवून देणारे या यात्रेचे रूप बनावे . हजारो लोकांची गरज, निकड, आवश्यक त्या गोष्टी पदार्थ वस्तू या यात्रेत मिळाव्या. नव्या तंत्रज्ञानाचा अविष्कार करणारी नवलाई तर यात्रेत यावीच तथापि नव्या जुन्यांचा संगम ठरणाऱ्या शेकडो बाबी या यात्रेची सर्वांसाठीची ओढ बनावी . अकलुजचा सयाजीराजे पार्क सारखी थोड्याफार प्रमाणात अनुभुती यात्रेत यावी . शेकडोंना प्रेरक उदबोधक ठरतील अशा प्रदर्शनांची रेलचेल या यात्रेत असावी . एक्सेल वर्ड चेच काहीसे स्वरूप यात्रेत हजारोंना आकर्षीत करणारे मोठे केंद्र ठरावे . अलुतेदारी – बलुतेदारी व्यवस्थेतल्या प्रत्येकाच्या व्यवसायाचा, शेतकरी कष्टकरी वर्गाचा गौरव ठरणारा प्रयोग ही यात्रा ठरावी . कृषी प्रदर्शन, पशु, पक्षी प्रदर्शनाच्या आकर्षणाने राज्यच नव्हे देशातील हजारोंचे पाय या आटपाडीकडे यावेत . देशभरातील प्रत्येक नावीण्य आटपाडीच्या यात्रेचे मोठे वैभव ठरावे . यात्रेसाठी येणारा प्रत्येक जण आपला पै – पाहुणा, नातलग, सगा – सोयरा भासावा आणि अतिथी देवो भव चा प्रत्यय स्थानीकांच्या कृतीतून त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वहावा . इतकी विशाल अंतकरणाची व्यापकता, सहृदयता आटपाडीकरांकडून व्यक्त व्हावी . तथापि देश विदेशात गाजलेल्या, गाजत असलेल्या माणदेशी आटपाडी तालुका वाशीयांचा समृद्ध वारसा जतन करणारी, यात्रेला येणाऱ्या प्रत्येकाला माणदेशी रत्नांबरोबर तालुकावाशीयांच्या औदार्य प्रेमाची बरसात करणारी ही यात्रा एक माध्यम ठरावी . चला तर मग आपण सर्व जण मिळून आपल्या या यात्रेच्या भविष्यातल्या भव्यतेविषयी आतापासूनच प्रयत्नाला लागू या . यात्रेच्या पंधरवड्यासाठी देश विदेशात विखूरलेला प्रत्येक माणदेशी माणूस, आटपाडी शहर आणि तालुकावाशीय सर्व काही सोडून आला पाहीजे . इतकी सर्वच प्रकारची विशालता आपण सर्व जण साधू या .
*ग्रामदैवत श्री .उत्तरेश्वर देवांचा विजय असो . श्रींना मनोभावे नमस्कार .*
*सादिक खाटीक

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *