द्वारकानगरी महिला बचत गटाच्या माध्यमातून मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन.

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 21 व्दारकानगरी महिला बचतगट बोरीपाखाडी च्या वतिने साईप्रेरणा कॉलनीतील गेली १० वर्षे अंतर्गत रस्ते आणी बंदिस्त गटारे उरण नगरपरिषदेच्या अंतर्गत येत असल्याने ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मागणीचे निवेदन उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच देण्यात आले.लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.अध्यक्षा सीमा अनंत घरत,उपाध्यक्ष वृशाली कदम,सचिव अमृता गायकवाड, खजिनदार सुवर्णा पाटील,सहप्रिया कासकर,हर्षदा सतेरे,भक्ती चौव्हान व सर्व सभासदांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *