Home
Home गडचांदूर / कोरपणा पांढरवणी च्या गोंगपा कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पांढरवणी च्या गोंगपा कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकदर्शन👉 मोहन भारती

जिवती :– जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत येरमी – येसापुर अंतर्गत येणाऱ्या पांढरवणी (महा) येथील गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कार्यकर्ते मानकु भीमराव धुर्वे, जंगु मानकु कोटनाके, कर्णु जंगु धूर्वे, मारोती रामू आडे, तुकाराम कच्चु धुर्वे, जगेराव गंगू कोटनाके, जंगु मारू कन्नाके, रामु गंगु कन्नाके, रंगू संगु पेंदोर, आनंदराव आत्राम यासह अनेकांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांना काँग्रेसचे दुप्पटे देवून आमदार धोटे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला.
या प्रसंगी जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, माजी उपनगराध्यक्ष अशफाक शेख, विष्णू मुसने, माजी सरपंच अनिता धुर्वे, सुनील शेडकी आणि महा पांढरवणी येथील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here