महात्मा गांधी विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, विज्ञान महाविद्यालय,विद्या मंदिर, स्कॉलर अकॅडमी, गडचांदूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या,प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,प्रभारी प्राचार्य रामकृष्ण पटले,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा,अशोक डोईफोडे होते
ध्वजारोहण उपप्राचार्य विजय आकनूरवार,यांच्या हस्ते करण्यात आले, तत्पुर्वी लोहपुरूष सरदार पटेल,व प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी च्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बबन भोयर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *