महात्मा गांधी तंटामुक्ती समिती खोपटेच्या अध्यक्षपदी प्रमोद ठाकूर.

 

लोकदर्शन उरण 👉( विठ्ठल ममताबादे

सोमवार दिनांक 12/09/2022 रोजी ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी(खोपटे )च्या अध्यक्ष पदी विघ्नहर्ता सामाजिक संस्था चे संस्थापक प्रमोद पांडुरंग ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी प्रमोद ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खोपटे गावातील माझ्याकडे येणारे वाद असतील तंटे असतील ते सामोपचाराने सोडवण्याचा पुरेपूर प्रामाणिक प्रयत्न करेन. व या पदाचा सन्मान वाढवण्याचा प्रयत्न करेन.यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच विशाखा ताई ठाकूर, उपसरपंच सुजित म्हात्रे, ग्रामसेवक रुपम गावंड, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, सात पाड्याचे अध्यक्ष, ग्रामसुधारण मंडळ खोपटेचे सचिव कुमार ठाकूर तसेच उपस्थित ग्रामस्थाचे आभार म्हणून धन्यवाद व्यक्त केले. ग्रामसेवक रुपम गावंड व सरपंच विशाखा ठाकूर यांनी प्रमोद ठाकूर यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.ग्रामस्थ, हितचिंतक, मित्र परिवार नातेवाईक यांनीही प्रमोद ठाकूर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *