लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित
महात्मा गांधी विद्यालय ,गडचांदूर च्या विद्यार्थ्यांनी एन एम एम एस
(आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक) शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शाळेचा उच्चत्तम निकाल लावला आहे, या शाळेतील
*50 उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र*ठरले आहेत, जिल्ह्यातून सर्वाधिक शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी होण्याचा बहुमान महात्मा गांधी विद्यालयाला प्राप्त झाला आहे,
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, ,प्रभारी सचिव धनंजय गोरे,सर्व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापिका सौ स्मिताताई चिताडे,, उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून करण्यात आले आहेत.