राजुरा काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी व सरदार पटेल यांना अभिवादन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


राजुरा :– भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी आर्यन लेडी इंदिरा गांधी स्मृतिदिन आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त आज दिनांक ३१ आॅक्टोबर रोजी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे सकाळी ठिक ११ वाजता आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही महान नेत्याच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ नेते दादा पाटील लांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला शहराध्यक्षा सौ संध्या चांदेकर, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सेवादलचे अध्यक्ष दिनकर कर्णेवार, अशोक देशपांडे, अब्दुल गणी अब्दुल हमिद, ॲड सदानंद लांडे, बांधकाम सभापती हरजीत सिंग संधू, नगरसेवक गजानन भटारकर, दिपा करमनकर, गीता रोहणे, साधना भाके, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, ॲड चंद्रशेखर चांदेकर, सुमित्रा कुचनकर, पुनम गिरसावळे, योगिता मटाले, रेखा बोढे, वामन वाटेकर, प्रणय लांडे, आकाश मावलीकर, उमेश गोनेलवार यासह काँग्रेसच्या विविध शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *