महात्मा गांधी विद्यालयात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार पटेल यांना अभिवादन।                 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त महात्मा गांधी विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे कार्यक्रम आयोजित केला होता,कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य विजय आकनुरवार,पर्यवेक्षक अनिल काकडे,हनुमान मस्की,सौ शोभा जीवतोडे, उपस्थित होत्या,
सर्वप्रथम माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,
याप्रसंगी उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी थोर पुरुषांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे संचालन प्रा प्रदीप परसुटकर यांनी केले,तर आभारप्रदर्शन प्रा संगिता पुरी यांनी केले,याप्रसंगी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यप्रसंगी उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *