नामदार विजय वडेटटीवार यांच्या पुढाकाराने ब्रम्हपूरी व सिंदेवाही येथील पंचायत समितीच्या इमारत बाधंकामासाठी २६ कोटीची प्रशासकीय मान्यता

By : Shivaji Selokar

ब्रम्हपुरी येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी १२ कोटी ४५ लक्ष १९ हजार रुपये निधी मंजूर

सिंदेवाही येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी १२ कोटी ३६ लक्ष ४२ हजार रुपये निधी मंजूर

चंद्रपूर – ब्रम्हपूरी व सिंदेवाही येथील पंचायत समितीची इमारत जुनी झाली असून कामकाजाच्या दृष्ट्रीने अयोग्य झाली आहे. या दोन्ही पंचायत समितीच्या नवीन सर्वसोयीनेयुक्त प्रशासकीय इमारत बांधकाम करण्यासाठी या क्षेत्राचे आमदार व जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण, खार जमीन विकास नामदार विजय वडेटटीवार यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. सदर प्रस्ताव शासनाकडे प्राप्त होताच विजय वडेटटीवार यांनी सतत पाठपुरावा केला. त्याच्या प्रयत्नाला यश आले असून ब्रम्हपूरी येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास १२ कोटी ४५ लक्ष १९ हजार रुपयाच्या अंदाजपत्रकीय कामास ग्राम विकास विभाग शासन निर्णय पंसई २०१७/प्रक्र ७९/बांध ४ दिंनाक २० सप्टेंबर २०२१ तसेच सिंदेवाही येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास १२ कोटी ३६ लक्ष ४२ हजार रुपयाच्या अंदाजपत्रकीय कामास ग्राम विकास विभाग शासन निर्णय पंसई २०१७/प्रक्र ८०/बांध ४ दिंनाक २० सप्टेंबर २०२१ च्या आदेशान्वये निधीसह प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी भव्य प्रशासकीय नविन इमारतीचे बांधकाम होणार असल्याने विजय वडेटटीवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ब्रम्हपूरी व सिंदेवाही येथील पंचायत समितीची इमारती १९५८ साली बांधलेली होती. सदर इमारतीचे बांधकाम जीर्ण णल्यामूळे व सदर इमारत ही प्रशासकीय कामाच्या दृष्टीने अपुरी असल्याने व कामकाजाच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी नविन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे आवश्यक होते. त्यामुळे नामदार विजय वडेटटीवार यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद चंद्रपूर यांना अंदाजपत्रकासह प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यानुसार कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी रितसर प्रस्ताव तयार करुन सन २०१७ मध्ये शासनाकडे पाठविले. या दोन्ही कामास प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याचे बघून विजय वडेटटीवार यांनी राज्य विधीमंडळाच्या विधानसभेत तारांकीत प्रश्न, अर्धा तास, लक्षेवधी, कपात सुचनाच्या माध्यमातून तत्कालीन शासनाचे लक्ष वेधले होते. तरी सुध्दा या कामास त्यावेळेस मान्यता मिळालेली नव्हती. लोकशाही आघाडी सरकार स्थापन होताच विजय वडेटटीवार मंत्री झाले आणि आणि त्यांनी दोन्ही पंचायती समितीच्या इमारत बांधकाम करण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झालू असून ब्रम्हपूरी व सिंदेवाही येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.

नामदार विजय वडेटटीवार यांनी, ब्रम्हपूरी पंचायत समितीची नविन प्रशासकीय इमारत गट क्रमाक ५३४ या जागेतील एक हेक्टर आर जमीन प्राप्त झाली असून या जागेवर नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम होणार आहे. तळमजल्याचे ८०.६७ चौ.मी, पहिल्या मजल्याचे ४८५.३४ चौ.मी., दुस-या मजल्याचे ४८५.३४ चौ.मी. असे एकूण १०५१.३५ चौ.मी. इतक्या क्षेत्रफळात बांधकाम होणार असून यामध्ये ग्रीन बिल्डींग संकल्पाना अंमलात येणार आहे. या सर्व कामासाठी आजच ग्रामविकास विभागाने १२ कोटी ४५ लक्ष १९ हजार रूपयांच्या कामास निधीसह प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. तर सिंदेवाही पंचायत समितीची नविन प्रशासकीय इमारत सर्व्हे क्रमाक २१२/२ या मोकळया जागेवर नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम होणार आहे. तळमजल्याचे ८०.६७ चौ.मी., पहिल्या मजल्याचे ४८५.३४ चौ.मी., दुस-या मजल्याचे ४८५.३४ चौ.मी. असे एकूण १०५१.३५ चौ.मी. इतक्या क्षेत्रफळात बांधकाम होणार असून यामध्ये ग्रीन बिल्डींग संकल्पाना अंमलात येणार आहे. या सर्व कामासाठी आजच ग्रामविकास विभागाने १२ कोटी ३६ लक्ष ४२ हजार रूपयांच्या कामास निधीसह प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. अशी माहिती देवून या क्षेत्राच्या विकासासाठी कृतीबध्द विकास आराखडा तयार करण्यात आलेला असून करोडो रूपयांची विकासकामे सुरू आहेत काही कामे लवकरच सुरू होणार आहे. अशी ही माहिती त्यांनी दिली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *