जेवरा येथील पूल ठरतोय शेतकऱ्यांसाठी वरदान

 By : Shivaji Selokar

नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

कोरपना तालुक्यातील जेवरा येथील नाल्यावर झालेला पूल हा शेतकऱ्यांकरिता वरदान ठरताना दिसत आहे.सदर पूल तत्कालीन वित्त व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व तत्कालीन आमदार अँड.संजय धोटे यांच्या पुढाकाराने व भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या अथक परिश्रमाने प्रधानमंत्री खनिज विकास निधी अंतर्गत १ कोटी ६० लक्ष निधी मंजूर होऊन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

कोरपना तालुक्यातील जेवरा येथील नाल्यावर पुलाची अत्यंत जास्त आवश्यकता होती,सदर मागणी ही मागील गेल्या ६०-७० वर्षांपासून प्रलंबित होती,सदर नाल्यावर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत होता,तसेच पावसाळ्यात तर ज्या दिवशी पाऊस पडला तर शेतकऱ्यांना ये-जा करणे कठीण जात होते,तसेच कोरपनावरून जवळपास १२ किलोमीटरचा फेरा मारून त्यांना गावाला जावे लागत असे तसेच नाल्यावरील पुरामध्ये अनेक जनावरेसुद्धा वाहून गेलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेकदा आर्थिक नुकसान झालेले आहेत.तसेच नाल्याला पूर आल्यास शेतकऱ्यांना शेतातसुद्धा जाता येत नव्हते.विशेष म्हणजे गावातील शेतकऱ्यांची ६०-७०% शेती ही नाल्याच्या दुसऱ्या बाजुला असल्यामुळे शेतकऱ्यांना नाला ओलांडून शेतात जावे लागत असे त्यामुळे गावातील ही एक प्रमुख समस्या होती.

शेतकऱ्यांची सदर नाल्यावरील पुलाचा प्रश्न भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या निदर्शनास आणून दिला त्यांनतर त्यांनी पुलाच्या मंजुरीकरिता अनेक वर्षे पाठपुरावा केला,राज्याचे तत्कालीन वित्त व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व राजुरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार अँड.संजय धोटे हे २१ जानेवारी २०१८ रोजी कोरपना येथील दौऱ्यावर आले असताना भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी सर्व शेतकऱ्यांना घेऊन त्यांच्या लक्षात सदर समस्या लक्षात आणून दिली त्यांनतर त्यांनी खनिज विकास निधी अंतर्गत १कोटी ६० लक्ष रुपये निधी मंजूर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले त्यांनतर त्यांनी सदर पुलाच्या कामाला मंजुरी प्रदान केली.

त्यांनतर सदर पूलाचे बांधकाम २०२०मध्ये पूर्ण झाले त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यात सुद्धा पुलावरून ये-जा करण्यासाठी सुलभ व सोयीचे झाले व शेतकऱ्यांना होणारा त्रास वाचला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. व गावातील नागरिकांसाठी पूल हा वरदान ठरलेला आहे.
सदर पूल मंजूर केल्याबद्दल गावातील नागरिकांनी सुधीर मुनगंटीवार व अँड.संजय धोटे यांचे आभार व्यक्त केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *