

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
, गडचांदूर शहरातील ओपन स्पेस सौंदर्यीकरण मोहिमेअंतर्गत गडचांदुर नगर परिषदेच्या वतीने शहरातील ठाणेकर लेआऊट व प्रभाग क्रमांक १ वरील ओपन स्पेस वर खेळाचे साहित्य ठेवण्यात आलेले आहेत. परंतु त्या खेळाच्या साहित्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळे या खेळण्यावर ‘ दिवसा पोर आणि रात्री ढोर’ खेळताना चित्र दिसून येते. अशाप्रकारे शासनाच्या पैश्याचा चुराडा करणे कितपत योग्य आहे?
अशा परिस्थितीत लवकरच हे खेळाचे साहित्य नादुरुस्त होतील, बिनकामाची निरर्थक ठरतील.
अर्थातच सदर साहित्याची देखभाल करणे व त्याला सुरक्षा पुरविणे अत्यंत गरजेचे आहे
तेव्हा सदर खेळाच्या साहित्यांना कुंपण किंवा इतर कोणत्याही प्रकारे सुरक्षा पुरवण्यात यावी तसेच सदर साहित्याची देखभाल करण्यात यावी अशी मागणी प्रा, जहीर सय्यद यांनी नगर परिषदेच्या अध्यक्षा व मुख्याधिकारी यांना निवेदनात केली आहे,