

By : Mohan Bharti
गडचांदूर : जि. प.उच्च प्राथमिक शाळा मानोली, खुर्द येथे कोवीड -19 ची 330 लसीकरण मोहीम शांततेत व काळजीपूर्वक 13 सप्टेंबर ला यशस्वी झाली. मोहीम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, श्री. जी. व्ही. पवार, ग्राम सचिव श्री. रामदास राठोड, डॉ. स्नेहा मोते ,सौ.सुचिता जीचकार परिचारिका, आशा सेविका सुजाता रामटेके, सौ. छाया जोगदंड,आ.गट प्र.सौ.पोर्णिमा भगत, संगणक प्रणाली प्रमुख बुद्धकुमारी, स्वाती, जैताबाई मडावी,अंगणवाडी सेविका कुसूमबाई चटप विद्यार्थी , सर्व शिक्षक मा. सरपंच,पोलिस पाटील,त.मु.स.अध्यक्ष, गाव पाटील,गावातील प्रतिष्ठीत , जेष्ठ नागरिक, नवयुवक, महीला बचत गट,यांच्या सहकार्याने जनजागृती करुन, लसीकरण मोहीम 100% यशस्वी करण्यात आली.
अंबुजा फाऊंडेशनचे श्री. सचिन आसुटकर यांनी सर्वांना नाष्टा व ग्रामसेवक श्री. रामदास राठोड यांनी सर्वांना दिवसभर चाय पाण्याचीही व्यावस्था केली मनोली खुर्द व बैलमपुर वासियांनी सहकार्य केले , दुर्योधन वाडगुरे व विकाश कोटरंगे या इयत्ता 8 वि च्या विद्यार्थ्यांनी रांगोळी व लस कक्ष सजावट केली. लस मोहीमेचे आयोजन राजेश पवार व वनपाल सोयाम यानी केले कोविड फाइटर यांचे स्वागत कु. सिता मेश्राम, सौ. थिपे ,प्रतिभा रायपुरे यानी केले.