

लोकदर्शन 👉
सुरेश चोपने, चंद्रपूर
अलीकडे चंद्रपुर जिल्ह्यात जादूटोणा आणी अंधश्रद्धा विषयाच्या ४ घटना उघडकीस आल्या, अजूनही ग्रामीन आणि शहरी भागात वैद्न्यानिक दृष्टीकोन रूजू शकला नाही ही शोकांतिका आहे. ह्यावर बुद्धी वादी लोकांनी आपली जिम्मेदारी पार पाडावी ह्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता. काल पत्रकार भवन चंद्रपुर येथे चंद्रपुर सिटीझन फ्रंट तर्फे,’अंधश्रद्धा, जादूटोणा विरोधी कायदा आसनी नागरिकांची जबाबदारी’,ह्या विषयावर पोलिस प्रशासनातर्फे सुशिल कुमार नायक आणि अंधश्रद्धा निर्मुलन समिती तर्फे अनिल दाहागावकर ह्यानी मार्गदर्शन केले.जेष्ट विधिज्ञ वर्षा जामदार ह्या अध्यक्ष स्थानी होते.प्रा सुरेश चोपणे ह्यानी प्रस्तावना केली.प्रा योगेश दुधपचारे ह्यानी संचालन तर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मझहर अली ह्यानी आभार प्रदर्शन मानले,कार्यक्रमाला शहरातील गनन्मान्य व्यक्ती मोठ्या संख्येने हजर होते.