

By : Mohan Bharti
वेळगाव वीज पडून मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना ४ लाखाच्या धनादेशाचे वितरण.
गोंडपिपरी :– आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी येथील तहसीलदार यांच्या कार्यालयात तालुक्यातील सार्वनिक वितरण व्यवस्था, दक्षता समिती व अन्य विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन गोंडपिपरी तालुक्यातील अधिकारी, रास्तभाव दुकानदार, नागरीक यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच गोर गरीब जनतेला शासकीय योजनेचे लाभ वेळेवर मिळाले पाहिजेत, कोणीही वंचित राहू नयेत असे निर्देश दिलेत. यानंतर तहसीलदार कार्यालयातच दिनांक 16/08/2021 ला वेळगाव येथील वीज पडुन मृत्यू झालेल्या पीडितांचे कुटुंबियांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शासनातर्फे मिळणारी ४,००,०००/- रूपये मदत धनादेश स्वरूपात देण्यात आली. वेळगाव येथील शेतकरी मारोती बापूराव चौधरी 37 वर्ष आणि रेखा अरुण घुबडे यांचा वीज पडुन मृत्यू झाला होता. यांच्या वारसांना प्रत्येक ४ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, समिति सदस्य सुमनबाई गेडाम, मायाबाई कोहपरे, दोनुजी गोनपल्लिवार, अर्चना झाडे, हरिदास मडावी, महिंद्र कुंघाडटकर, नायब तहसिलदार प्रवीण जमदाळे, गट विकास अधिकारी एस. झेड. बुळकुंदे, पुरवठा निरिक्षक नम्रता पातकर, सहाय्यक निरीक्षक एस. ए. मेश्राम आदी उपास्थित होते.