Home
Home Breaking News वसंतराव नाईक विद्यालयात बालक दिन साजरा

वसंतराव नाईक विद्यालयात बालक दिन साजरा

लोकदर्शन 👉मोहन भारती

कोरपणा-वसंतराव नाईक विद्यालय कोरपणा येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिन म्हणून साजरी करण्यात आली याप्रसंगी मुख्याध्यापक श्री डी जी खडसे पर्यवेक्षक श्री पी बी बोंडे जेष्ठ शिक्षक साधू बावणे श्री जी एस गोडे यांनी नेहरूजींच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून सर्व विद्यार्थ्यांना बालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या
यावेळेस विद्यार्थ्यांनी नेहरूजींच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषण व गीत सादर केले कार्यक्रमाचे संचालन कुमारी संपदा नक्षणे हिने तर आभार प्रदर्शन जानवी नक्षीने हिने केले यावेळेस सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here