गडचांदूर मार्गे चंद्रपूर भोयगाव बससेवा सुरू करा* ,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️माजी उपसरपंच उमेश राजूरकर यांची मागणी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️भोयगाव-गडचांदूर मार्ग वाहतुकीसाठी सज्ज. ⭕नागरिकांचे मोठे हाल

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर,,👉(प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
– मागील कित्येक वर्षांपासून भोयगाव गडचांदूर या रस्त्यांमुळे चंद्रपूर भोयगाव (गडचांदूर मार्गे) बस सेवा कधी सुरू तर कधी बंद होत असल्यानें नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे ही बाब लक्षात घेत निमणी येथील माजी उपसरपंच उमेश राजूरकर यांनी बस सेवा सुरू करावी यासाठी विभागीय वाहतूक नियंत्रक स्मिता सुतावने यांना निवेदन देण्यात आले
गडचांदूर जवळ अंबुजा माणिकगड (अल्ट्राटेक)अल्ट्राटेक दालमिया या सारख्या सिमेंट कंपन्या असल्यानें याचं मार्गाचा अवलंब करावा लागत असून ओवरलोड ट्रकने या रस्त्याचा पूर्णपणे बोजवारा वाजला होता यासाठी कित्येक आंदोलने झाली तर कित्येक हाकणाक बळी या रस्त्यावर गेले आहे.
आमदार सुभाष धोटे यांनी भोयगाव गडचांदूर या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याने या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून या भागातील नागरिकांना जो मनस्ताप सहन करावा लागत होता तो आता कमी झाला आहे तेव्हा चंद्रपूर भोयगाव गडचांदूर बस सेवा सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनकडून होत आहे यावेळी आशिष देरकर शैलेंष लोखंडे नंदकिशोर धानोरकर राजू काळे गणेश तुराणकर आदी उपस्थित होते

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
रस्त्यात खड्डा की खड्यात रस्त्यामुळे या भागातील नागरिकांना या रस्त्याने बस बघितली नाही रस्त्याचे काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीसाठी सज्ज झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तेव्हा तात्काळ बससेवा सुरू करावी

उमेश राजूरकर
माजी उपसरपंच ग्रामपंचायत निमणी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
भोयगाव-गडचांदूर रस्त्यांवरील मोठं मोठ्या खड्यांमुळे बस सेवा सुरू ठेवणे शक्य नव्हते आता कार्तिकी पौर्णिमा वढा जत्रेसाठी आम्ही बससेवा सुरू केली आहे या मार्गाने सुध्दा लवकरच बस सेवा सुरू करू

स्मिता सुतावने
विभागीय वाहतूक नियंत्रक चंद्रपूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here