राष्ट्रीय महामार्ग जि आर आय एल कंपनी कडून पेसा कायद्याचे उल्लंघन ग्राम सभाना नाकारूण उत्खनन?

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

चंद्रपूर जिल्ह्यातीलआदिवासी बहुल पेसा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या सावलहिरा चनई बु ग्रामपंचायत हद्दीतील नाल्या वरूनअविरत राष्ट्रीय महामार्ग राजुरा गोविंदपुर 353 बी या रस्ते विकास कामासाठी खनि कर्म विभाग महसूल विभागाच्या शासन निर्णयाच्या अधिनमुरूम रेती दगड वाहतूक व उत्खनन गौण खनिजपण ही देण्यात आली असली तरी शासनाच्या निर्णय व नियमानुसार पूर पातळी क्षेत्र बाहेरील तसेच मंजूर देण्यात आलेल्या सीमांकन क्षेत्र निश्चित न करता महसूल व जलसंधारण विभागाच्या अधिकारी यांची उपस्थिती नसताना ज्या भागातील जल जंगल जमीन वर आदीवाशांचा अधिकार आहेशासनाने पेसा कायद्यातील तरतुदीनुसार ग्रामसभेला अधिकार देण्यात आलेले असताना अशा ग्रामपंचायतसरपंच व सचिवांना हाताशी धरून एनओसी घेण्यात आली व सदर जागेबद्दल कोणत्या सर्वे नंबर च्या काठावरून व नाल्याच्या कोणत्या क्षेत्रातून उत्खनन होणार आहे याची साधी माहिती सुद्धा ग्रामपंचायतच्या सरपंच व सचिवांना नाही असे असताना ग्रामसभेमध्ये चर्चा न करता व याबाबतची कोणतीही माहिती नागरिकांना न होऊ देता कंत्राटदार कंपनीने मिळेल तिथून उत्खनन करून शासनाच्या स्वामित्व धनाला चुना लावल्या जात आहे सावल हिरा शिवारातील उत्खनन करण्याची परवानगी नसताना जेवरा ते सावलहिरा याभागात नाल्यातुन पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाची पायमल्ली करीत जिथे तिथे जिव घेणारे खड्डे तयार केले रेती मिश्रीत दगड वाहतुक झाल्याने नाल्यात पावसाच्या पुरामुळे धोका निर्माण झाला आहे भुगर्भात पाषाण लागे पर्यंत उत्खनन झाल्याने जल निचरा व जलसंचयन साठे नष्ट झाले आहे भविष्यात पिण्याचे पाणी व शेतकऱ्यांना सिंचनावर परिणाम होईल कंपनी च्या सामाजिक दायित्व निधि अंतर्गत उत्खनन झालेल्या कोरपना भागातील नाल्यावर जि आर आय एल कंपनी ने सि एस आर निधितून बंधारे निर्माण करावे व उत्खनन क्षेत्राच्या उत्खननाची तपासणी करूण स्वामित्वधन आकारण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी चे आबीद अली यांनी पालकमंत्री सुधिर मुनगटीवार जिल्हाधिकारी व प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांचे कडे केली आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *