महागायिका कार्तिकी गायकवाड, पिसे यांनी केला आश्रमशाळेत वाढदिवस साजरा..

लोकदर्शन 👉 :-स्नेहा उत्तम मडावी

शनिवार दि १९ नोव्हेंबर २०२२ रोजी सारेगमप लिटिल चॅम्प्सची विजेhती कार्तिकी गायकवाड पिसे यांनी भोसरी येथील यशवंतराव चव्हाण आश्रमशाळेत जाऊन, तेथील मुलांच्या सोबत आपला वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला. कार्तिकीने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील मुलांना वह्या, पेन, हात रूमाल व फळांचे वाटप केले. यावेळी कार्तिकीचे पती रोनित पिसे, वडील पं कल्याणजी गायकवाड आई सुनिता गायकवाड, भाऊ महागायक कौस्तुभ गायकवाड, कैवल्य गायकवाड, शाळेचे संचालक संदीप राक्षे, उद्योजक राजेश राक्षे साहित्यिक संतोष साळुंखे, मुख्याध्यापक लाला साळुंखे, रितेश राक्षे हे उपस्थित होते..

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *