



लोकदर्शन कोल्हापूर 👉सुनील भोसले पत्रकार
प्रत्येक क्षेत्रात कार्य करत असताना संकटे येतातच, संकटे आली की संघर्षाची प्रेरणा, जिद्द आणि जगण्याची ऊर्जा सुद्धा निर्माण होते. नव्या रूपात आलेल्या संकटाबरोबर बळही मिळते, त्यातून चांगले करण्याची प्रेरणा आणि संधी घेऊन ज्या ज्या व्यक्तीने स्वतःच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे ते पाहून प्रत्येक युवा पिढीला मी असा घडणार असे वाटते. तेच खरे कार्य आणि अशा कार्याचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. अशा शब्दात डेंटिस्ट डॉ. आशुतोष देशपांडे यांनी डीआयडी फाउंडेशनच्या कार्यक्रमांमध्ये सन्माननीय पत्रकार व पोलीस यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
डीआयडी फाउंडेशन यांच्या विद्यमाने पोलीस व पत्रकार सन्मान कार्यक्रमात डॉ. आशुतोष देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कोल्हापुरातील थ्री स्टार हॉटेल रेडियंट येथे ढोल ताशा व तुतारीच्या आवाजात दमदार व भव्य नियोजनामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
पोलीस व पत्रकार यांच्या कार्याची दखल घेऊन शाल, श्रीफळ, फेटा, प्रमाणपत्र, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांना पुरस्कृत करण्यात आले, त्याचबरोबर पोलीस मित्र संघटनेमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी येरवडाचे प्रिसिपल श्री चंद्रमणी इंदुरकर होते. प्रमुख पाहुणे डॉ आशुतोष देशपांडे, शैलेश पाटील (भैय्या), डॉ सुरेश राठोड, डॉ मॅडी तामगावकर, डॉ प्रतीक मुनगेकर, व विश्वसुंदरी शैलजा दूनु, यांच्या शुभ हस्ते उपस्थित पत्रकार, संपादक व पोलीस यांचा सन्मान करण्यात आले. प्रमुख उपस्थिती सेवानिवृत्त डी वाय एस पी शिवाजीराव जमदाडे, डी वाय एस पी पुरुषोत्तम पाटील, कमलाकर वरटेकर, सरदार पाटील व यशवंत सातपुते आदी मान्यवर होते. पुरस्कार प्राप्त मान्यवरांना काही कारणास्तव उपस्थित राहून शकले नाही मधुरिमा राजे छत्रपती व जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी फोनवरून ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमादरम्यान डॉ. आशुतोष देशपांडे यांनी उपस्थित सर्व पत्रकार व पोलीस यांना आपल्या डेंटल क्लिनिक कडून पूर्ण दाताची तपासणी, एक्सरा फ्री मध्ये व अतिशय अल्प दरामध्ये दाताची ट्रीटमेंट आमच्याकडून दिली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी आई महालक्ष्मी च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करवीर नगरीतील अनेक न्युज पेपर, इलेक्ट्रॉनिक मीडिया व यूट्यूब चैनल प्रतिनिधी व फोटोग्राफर याचबरोबर अहो रात्र सेवा देणारे पोलीस कर्मचारी आदी मान्यवरांना पुरस्कृत करण्यात आले.