लोकदर्शन👉 महादेव गिरी
वालुर/ प्रतिनिधी
दिनांक 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी सोलापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बॉक्स लगंडी स्पर्धेत खुल्या गटातून श्रीमती शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वालूर.येथील विकास राजू राठोड या खेळाडूची बॉक्स लगंडी या स्पर्धेत महाराष्ट्र बॉक्स लगंडी या संघात निवड झाली.
या यशाबद्दल वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री मा.अनिलभाऊ नखाते, सचिव सौ.भावनाताई नखाते, संचालक तथा जिल्हा बॉक्स लगंडी असोसिएशनचे अध्यक्ष श्री अंजिक्यभौया नखाते ,समाज कल्याण साहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे ,समाज कल्याण निरिक्षक श्री तुकाराम भरड साहेब ,प्राचार्य आर.व्ही. नखाते, मुख्याध्यापक श्री शाम मचाले ,प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.