साखरवाही येथील युवकांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा साखरवाही येथील राहुल आनंदराव पडवेकर, दामोदर माधव परसुटकर, अमर धनराज वनकार, प्रकाश तातोबा आगलावे यासह अनेक युवकांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांना काँग्रेसचे दुप्पटे देवून आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला आणि अभिनंदन केले. काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि तळागाळातील जनतेच्या हितासाठी होणारे विकास कार्य लक्षात घेता अनेक तरुण काँग्रेस पक्षात येत असून येणाऱ्या काळात अनेक युवक पक्षात प्रवेश घेण्यासाठी उत्साही आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here