महात्मा गांधी विद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती साजरी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
एकात्म मानवतावादाचे महान विचारवंत ,प्रेरणा स्रोत ,लेखक, अर्थतज्ञ,त्याग व तपस्या ची प्रतिमूर्ती पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती स्थानिक महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपप्राचार्य विजय आकनूरवार होते,प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे, दिन विशेष समिती च्या प्रमुख प्रा नंदाताई भोयर होत्या
सर्वप्रथम पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शीतल बोधे व उपप्राचार्य विजय आकनूरवार यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला
संचालन शीतल बोधे यांनी केले तर आभार माधुरी मस्की यांनी केले, याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *