स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धा 2022सेलू

लोकदर्शन वालुर/ प्रतिनिधी👉महादेव गिरी

आज दिनांक 09 जुलै 2022 रोजी
*श्री उमेश राऊत*
*गटशिक्षणाधिकारी*
*पंचायत समिती सेलू*
– *श्री गजानन वाघमारे* *शिक्षणविस्तार अधिकारी* पंचायत समिती सेलू यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग पंचायत समिती सेलू अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022 निमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धेत सर्व केंद्रस्तरावरील निवडलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी अश्या 2 गटात घेण्यात आली.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे..

♦️ *इ. १ली ते ५वी गट* ♦️
1️⃣प्रथम क्रमांक – *कु तृप्ती राजाभाऊ पवार* (जि. प. प्रा. शा. शिंदेटाकळी)

2️⃣द्वितीय क्रमांक – *कु श्रेया हरीभाऊ रोडगे* (जि. प. के प्रा. शा. रवळगाव)

3️⃣उत्तेजनार्थ – *कु समृध्दी शामराव गजमल* (जि. प. के प्रा शा डासाळा)

♦️ *इ. ६वी ते ८वी गट* ♦️

1️⃣प्रथम क्रमांक – *कु सिद्धि सुरेश रोडगे* (के प्रा शा रवळगाव

2️⃣द्वितीय क्रमांक – *कु फिरदोस फातेमा शेख शकील* (जि. प.. प्रा. शा. बोकन्या ऊर्दु)

3️⃣उत्तेजनार्थ – *कु ऋतुजा जिवाजी शळके* (के जि बि व्हि सेलू )

सर्व विजयी स्पर्धकांचे पेन व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राम मैफळ(केंद्रप्रमुख)वालूर व श्री गजानन भिते (केंद्रप्रमुख) डासाळा श्री माणिक जाधव (केंद्रप्रमुख)रवळगाव , श्री मधूकर काष्टे (मुख्याध्यापक) डासाळा श्री चंदन (लेखाधिकारी)सेलू यांची कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.

सदरील स्पर्धेचे परीक्षक म्हणून *श्रीमती आनघा पांडे मॕडम* व *श्रीमती किर्ती राऊत मॅडम* यांनी काम पाहिले. गट साधन केंद्राच्या श्रीम सुनिता काळे मॕडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले तर श्री.कदम सर (लाडनांद्रा) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले..व श्री पाटणकर सर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन श्रीम सुनिता काळे व श्रीम अंंजली पद्माकर यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *