राहुल गांधींच्या समर्थनार्थ जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन

लोकदर्शन👉 मोहन भारती

*⭕ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंतनु धोटेंच्या नेतृत्वात युवकांनी नोंदविला निषेध*

चंद्रपूर :–

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे इमानदार आणि देशप्रेमी नेते राहुलजी गांधी यांना आणि त्या माध्यमातून संपूर्ण काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी तसेच देशातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी झटनाऱ्या विरोधी पक्षाचा आवाज दडपण्यासाठी केंद्र सरकारने ईडी च्या माध्यमातून जे षडयंत्र चालविले आहे. त्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतातील ईडी ऑफिससमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर चंद्रपूर ग्रामीण युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाँधी चौक चंद्रपूर येथे जिल्हा युवक काँग्रेसचे ग्रामीण *जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे* यांच्या नेतृत्वाखाली काळे कपडे परिधान करून आणि दमनकारी यंत्रणेचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.
या प्रसंगी युवक काँग्रेसचे महासचिव प्रणय लांडे, गौतम पाटील, सचिव सुमित आरेकर, रोशन ढोक विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष चिमूर, प्रभाकर नागतोडे विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष ब्रम्हपुरी, शुभम चिमुरकर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वरोरा,
बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष जुनेद सिद्दिकी, राजुरा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मंगेश गुरनुले, वरोरा विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष निखिल राऊत, मुल विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलावर, चिमुर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रशांत डवले, जिल्हा सचिव इर्शाद शेख, नागभीड युवक काँग्रेस अध्यक्ष नितीन कटारे यासह युवक काँग्रेस चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *