प्रवासी सेवा प्रतिष्ठानची स्थापना. न्यास नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- १७/०६/२०२२ :-* सध्या दिवसेंदिवस वाहनांच्या अपघातीची प्रमाण वाढत असुन सदर अपघातास कारणीभूत वाहतुक नियम न पाळणे, वाहन वाहक व प्रवासी निष्काळजीपणाने प्रवास करणे वाहन वेगाची मर्यादा ओलांडणे अशा अनेक कारणे आहेत. आणि अपघात झाल्यानंतर ज्या सोई – सुविधा पाहिजे ते वेळेवर न मिळाल्याने अनेक निष्पाप लोक मरत आहेत. हे रोखण्यासाठी गुरूरथम् परिवाराच्या वतीने प्रवासी सेवा प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करण्यात आली असुन न्यास नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले असल्याचे विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी माहिती दिली आहे.
सध्याच्या वेगवान युगात जो – तो आपला धेय अति शिग्रपणे घाठण्याचा प्रयत्न करतो आणि या वेगवान युगात प्रवास करताना वाहनांची आवश्यकता ही गरजेची झाली आहे. आणि वाहनाप्रमाणे रस्त्यांची मोठी सुधारणा झाल्याचे दिसून येते. जो – तो आपआपल्या मर्जीचे वाहने घेऊन तीर्थक्षेत्र, विविध कार्यक्रम, धार्मिक स्थळे, सहली प्रसंगानुसार प्रवास हे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. या प्रवासात विविध कारणात्सव अपघात सुध्दा मोठ्या प्रमाणात होत आहेत. होणारे अपघात टाळण्यासाठी विविध उपाय, जनजागृती, मदतकार्य, न्यायिक व हॉस्पिटल सेवा शक्य होईल तेवढा मदत करण्याचा उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
सदर संस्थेचे सोलापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात येऊन सोलापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
सदर प्रसंगी संस्थापक अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज), राजेंद्र फडकुले, राजशेखर रोडगीकर यांनी प्रसिध्दी माध्यमांना संस्थेचे उद्देश व उपक्रमाविषयी माहिती दिली. सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज), राजेंद्र फडकुले, राजशेखर रोडगीकर, प्रसाद जगताप, विठ्ठल कुऱ्हाडकर, ॲड. मुनिनाथ कारमपुरी, गुरूनाथ कोळी आदि उपस्थित होते. प्रवासी सेवा प्रतिष्ठान या संस्थेची नोंदणी ॲड. मुनिनाथ कारमपुरी यांनी केली. *●◆■★●◆■■◆◆◆■★◆◆■◆◆■◆●●*
*फोटो मॅटर :- प्रवसी सेवा प्रतिष्ठान या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र न्यास नोंदणी अधिक्षक श्री. कुमठेकर साहेब यांच्याकडून स्विकारताना विष्णु कारमपुरी (महाराज), डॉ. राजेंद्र फडकुले, राजशेखर रोडगीकर, ॲड. मुनिनाथ कारमपुरी, विठ्ठल कुऱ्हाडकर, प्रसाद जगताप, गुरूनाथ कोळी दिसत आहेत.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *