वसंतराव नाईक विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

कोरपना – माध्यमिक शालांत परीक्षा वर्ग दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला.यात वसंतराव नाईक विद्यालय कोरपनाचा ९३.२७ टक्के लागला.
विद्यालयातून प्रथम क्रमांक प्रज्ञा वामन जीवने (८६.८० टक्के ) द्वितीय क्रमांक मनस्वी बंडू गेडेकर (८४.२० टक्के ) तर तृतीय क्रमांक हर्ष देरकर (८१.४० टक्के ) हिने पटकाविला. यंदाच्या वर्ग दहावीच्या परीक्षेत ११९ विद्यार्थी बसले होते. त्यात प्राविण्य श्रेणीत पाच , प्रथम श्रेणी ५०, द्वितीय श्रेणी ४६, पास श्रेणी दहा असे एकूण १११ विद्यार्थी पास झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीधरराव गोडे , सचिव भाऊराव कारेकर, संचालक अरुण कुकडे, गणेश गोडे , वसंतराव नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी जी खडसे, पर्यवेक्षक बोंडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *