जनसामान्यांच्या समस्या तातडीने सोडवा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕आमदार सुभाष धोटेंनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले निर्देश.

राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात आढावा बैठक घेऊन राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी या चारही तालुक्यातील विविध विषयावर तपशीलवार चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी युध्द स्तरावर काम करण्यात यावे अशा सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यात महसुल विभाग अंतर्गत सर्व तालुक्यातील भोगवटदार वर्ग 2 चे 1 मध्ये अंतर्भाव करणे, जमीनीचे पट्टे वाटप करणे, यासंदर्भातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावेत. गडचांदुर येथे बसस्थानक बांधकामासाठी जागा उपलब्ध करणे, नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानग्रस्तांना तातडीने अनुदान वाटप करणे, अनेक गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे सुटलेली आहेत. त्यांना नुकसान भरपाई देणे संदर्भाने कार्यवाही करणे, चुकीचे संर्वेक्षण करणारे तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांचेवर कारवाई करणे, वेकोलीच्या कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरावस्था, प्रदुषणात वाढ, शेत पिकांचे नुकसान याबाबत तक्रारी संदर्भाने वेकोली कडुन अमलबजावणी करणे संदर्भाने महसुल विभागाकडुन कारवाई करणे, राशन कार्ड धारकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी सोडविणे, राष्ट्रीय महामार्ग 930 डी आणि 353 बी अंतर्गत अधिग्रहीत जमिनीचा निवाडा, मोबदला यासंदर्भात कारवाई करणे, क्षेत्रातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासंदर्भात कोविड लसिकरण पुर्ण करणे, उपजिल्हा/ग्रामीण रूग्णालय स्तराव आॅक्सीजन प्लाॅन्टचे निर्माण कार्य पुर्ण करणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरणे, कृपोषित बालकांच्या आरोग्यांच्या संबधाने आपले स्तरावरूण उपाय योजना करणे, क्षेत्रातील विद्युत व्यवस्था सक्षम करणे, मंजुर कामांना गती देणे, कृषी पंप विज जोडणीचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, AG पंपाचे डिमांड काढणे आनलाईन अर्जदारांना तातडीने सेवा देणे, AG पंपाचे विद्युत प्रवाह खंडीत झाल्यानंतर तातडीने जोडुन देणे. आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर देणे, विज जोडणी करणे, सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत उपविभागातील मंजुर कामे पुर्ण करणे, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील नविन प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे पूर्ण करणे, सिचांई विभाग अंतर्गत सद्या स्थितीत सुरू असलेल्या कामांना गती देणे, पुरात खराब झालेल्या बंधाऱ्यांची दुरूस्ती कामे पुर्ण करणे, विभागातील मामा तलाव व को. प. बंधाऱ्यांची कामे पूर्ण करणे, वन विभाग अंतर्गत वन्य प्राण्यांनी केलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे, वन व्यवस्थापनाची कामे मजुरांकडुन करीत असतांना त्यांचे दरमहा देण्यात येणारे देयके डि.बी. टी. व्दारे करणे, विरूर स्टे. वनसडी, राजुरा, गोंडपिपरी व जिवती वन परीक्षेत्रातील शेतकऱ्यांना शामाप्रसाद मुखर्जी योजनेतुन पिक संरक्षण किट वाटप करणे, कृषी विभाग अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर साहित्यांचे वाटप करणे, यात सदरील साहित्य अत्मा अंतर्गत स्थापित झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडुन दिल्या जात आहे. यात साहित्यांचा पुरवठा शासन करतो व कंपन्यांच नाव होत असल्याने यात शासनाची भुमिका काय ते ठरविणे, पंचायत समिती अंतर्गत सर्व तालुक्यातील प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत ड यादीमधील नावे सुटलेल्या लाभार्थींची नावे तातडीने समाविष्ठ करणे, रमाई/शब्बरी/पारधी/आदिम कोलाम योजनेमधुन लाभार्थींना घरकुल मंजुर करणे, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील 60-40 च्या टक्केवारीमधील अनुसुचित जाती जमातीमधील लाभार्थींचा लाभ इतर घटकांना देणे, रोजगार हमी योजने अंतर्गंत ग्रामपंचायत स्तरावर रोजगार सेवकाच्या माध्यमाणे कामे केली जातात रोहयो मध्ये मजुरी रोजगाराना नियमित कामे मिळत नाही परंतु रोजगार सेवक आपल्या मर्जीतील नातेवाईकांच्या खांत्यावर मजुरी वाटुन घेत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या संदर्भात चौकशी करून कारवाई करणे, पाणी टंचाई विषयी आराखडे तयार करून पाठविणे, वेकोलीच्या कोळसा उत्खनानामुळे खान परिसरातील पाण्याची पातळी खालावली आहे. भविष्यात पाणी टंचाई उद्भवु नये यासाठी वेकोली कडुन पाणी पुरवठा योजना व आरो वाॅटर व्यवस्था करणेसदंर्भाने कार्यवाही करणे, घरकुल मंजुर असलेल्या लाभार्थीना 500 स्के्रअर फिट जागा उपलब्ध करून देणे, नगर परिषद अंतर्गत नगर पालीका/पंचायत क्षेत्रातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या कामांना गती देणे, राजुरा नगर पालीका क्षेत्रातील पट्टे देणेसंदर्भांतील कार्यवाही करणे, भुमि अभिलेख अंतर्गत सर्व तालुक्यातील ड्रोन च्या माध्यमातुन किती संर्वेक्षण करण्यात आली याची माहिती सादर करणे यासह क्षेत्रातील विविध विभागाच्या कामांचा आढावा घेऊन सर्व विभागाने जनसामान्यांच्या कामांना प्राधान्य देऊन तातडीने सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या प्रसंगी राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, अतुल गांगुर्डे, प्रवीण चिडे, उपविभागीय वनअधिकारी अमोल गर्कल, उपकार्यकारी अभियंता विद्युत विभाग श्रीनिवास बडुगु, उपविभागीय कृषी अधीकारी एम पवार, निरीक्षक अधिकारी पुरवठा विभाग सविता गंभीरे, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे, डी. बैलमवार, विजय पेंदाम, पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सदाशिव ढाकणे, उपकार्यकारी अभियंता महावितरण इंदुरकर, ढोकणे, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, विशाखा शेरखी यासह राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *