मागवारी निमित्त् श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळीचे पंढरपुरात हरी जागर                                         

लोकदर्शन 👉 मोहन भारती

सोलापूर, दिनांक. माघवारी निमित्त् पदमशाली दिडी संस्थेच्यावतीने पंढरपूर येथे आखिल भारतीय पदमशाली संघम धर्मशालेत अंखड हरी नामन सप्ताह आयोजित करण्यात आले. या सप्ताहात श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाच्यावतीने भजन कार्यक्रमाने हरी नाम जाघरकरण्यात आले.
श्री पदमशाली दिडी संस्थेच्यावतीने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही मागवारी अंखड हरी नामन संप्ताह दि.9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2022 असे 7 दिवस साजरा करण्यात आले. या सप्ताहात सोलापूर ते पंढरपुर पाही दिडी यात्रा पंढरपुराला पोचल्यानंतर श्री क्षेत्र पंढरपुर येथील अखिल भारतीय पदमशाली धर्मशाळेत शुक्रवारी ते मंगळवारपर्यंत हरीपाठ, पारायण, प्रवचन, किर्तन, भारुड, सतसंग विविध कार्यक्रम करण्यात आले. या सप्ताहात दि.11 फेब्रुवारी रोजी रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत श्री दिंगबर मुनिनाथ भजनी मंडळ व श्री सिध्दारुढ भजनी मंडळ यांचा तेलुगू, मराठी, कनडा इ. भक्ती गीतांचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर भजन कार्यक्रम विष्णु कारमपुरी(महाराज) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भजनी कार्यक्रमात श्रीनिवास चिलवेरी, नागनाथ कारमपुरी, लक्ष्मण् देविदास, अनिता देविदास, बालाजी भंडरी, श्रीधर देविदास, प्रविण मुदगुडी, बालाजी कोटा, अरविद कोटा, व श्री. दिंगबर मुनिनाथ भजनी मंडळ व श्री सिध्दारुढ भजनी मंडळ यांचे कलाकार व सहकारी सामील झाले होते. या भजनी कार्यक्रमास भावीक वारकरी बंधु- भगिनी मोठया संस्थेने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *