Home
Home सामाजिक वडार समाज : पाषाणातून नंदनवन फुलवणारा कष्टाळू समाज

वडार समाज : पाषाणातून नंदनवन फुलवणारा कष्टाळू समाज

लोकदर्शन ✍️ आयु. विलास खरात, आटपाडी (जि. सांगली)

महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त जातींमध्ये समाविष्ट असलेला वडार समाज हा समाजरचनेतील उतरंडीमध्ये दीर्घकाळ उपेक्षित राहिलेला समाज आहे. महाराष्ट्रासह ओडिशा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व तेलंगणा या राज्यांत विखुरलेला हा समाज ‘ओड, वड्डा, वड्डर, वडार’ अशा विविध नावांनी ओळखला जातो. संशोधकांच्या मते या समाजाची नावे द्रविड भाषिक परंपरेतून उदयास आली असून त्यांचा संबंध नागवंशी द्रविडांशी जोडला जातो.

पारंपरिक व्यवसाय व सामाजिक रचना

वडार समाज हा प्रामुख्याने कष्टप्रधान व्यवसाय करणारा समाज आहे. पारंपरिक व्यवसायांनुसार या समाजात तीन प्रमुख पोटजाती आढळतात—

1. गाडी वडार : दगडखाणी, बांधकाम, दगड घडविणे

2. माती वडार : तलाव, बंधारे, कालवे, खोदकाम

3. पायरवट : दगडी मूर्ती, जात्या, पाटे, मंदिर व इमारतींचे शिल्पकाम

इतिहासातील गड-किल्ले, तटबंदी, मंदिरे, राजवाडे उभारण्यात वडार समाजाचे योगदान मोलाचे आहे. गावाबाहेर वास्तव्यास असूनही गाव उभारणीच्या कार्यात हा समाज कणा ठरला आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक आदिम जमातींनी संस्थानिकांच्या बाजूने इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. त्यामुळे इंग्रजांनी १८७१ साली गुन्हेगारी जमाती कायदा लागू करून वडार समाजासह अनेक भ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here