अनघा मराठी दिवाळी अंक प्रकाशन २०२१, व्याख्यान, कवि संमेलन आणि कथा स्पर्धा विजेत्यांचा सत्कार सोहळा.

लोकदर्शन 👉 महेश कदम मुबई

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, ठाणे जिल्हा केंद्र व अनघा प्रकाशन ठाणे यांच्या संयुक्त विघमाने व्याख्यान, दिवाळी अंक प्रकाशन व कवि संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
विषय: मराठी दिवाळी अंक-परंपरा आणि वास्तव.
व्याख्यान श्री. अभिराम भडकमकर (सुप्रसिद्ध नाटककार) त्याच प्रमाणे अनघा दिवाळी २०२१ कथा स्पर्धा विजेत्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.

कवि संमेलन चे अध्यक्ष डाॅ. महेश केळूसकर असुन सहभाग श्रीमती. मीनाक्षी पाटील, श्रीमती. जयश्री जोशी, श्रीमती. अलका असेरकर, श्रीमती. मेग मेहेन, श्रीमती. मंदाकिनी पाटील व श्री. दिलीप सावंत असणार आहे.

कार्यक्रम चे सुत्रसंचालन धनश्री प्रधान-दामले असुन विशेष उपस्थिती डाॅ. भारत कुमार राऊत, डाॅ.विजय चोरमारे, श्री. गणेश मतकरी, डाॅ. प्रदिप कर्णिक, श्री. संतोष शेणई आणि श्री. रामदास फुटाणे हे मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

सदर कार्यकम रविवार दिनांक: २४ ऑक्टोबर २०२१, रोजी सायंकाळी ५:०० वाजता, सहयोग मंदिर, दुसरा मजला, घंटाळी, नौपाडा ठाणे पश्चिम येथे विनामूल्य होणार आहे.

विशेष सहकार्य: मुरलीधर नाले, अध्यक्ष, ठाणे केंद्र, अमोल नाले, सचिव, ठाणे केंद्र, विद्या नाले प्रकाशिका अनघा प्रकाशन.

सदर कार्यकमाला अनेक मान्यवर उपस्थित रहाणार असुन शासन नियम प्रमाणे सामाजिक अंतर व मास्क बंधनकारक राहिल.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *