कडोली-मानोली-बाबापूर धिडसी आणि सोंडो -वरुर-सोनुर्ली बससेवा सोमवारपासून सुरु होणार

लोकदर्शन 👉 मोहन भारती


*विध्यार्थ्यानी बबनभाऊ उरकुडे यांच्या शिवसेना कार्यालयात भेट देऊन मांडली समस्या*

*विध्यार्थ्यांसह आगार प्रमुखांसोबत चर्चा करून सोडवली समस्या*

 

तालुक्यातील ग्रामीण भागातील विध्यार्थी शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करतात.
शाळा महाविद्यालय चालू झाल्यापासून ग्रामीण भागातून येणाऱ्या विध्यार्थ्यांना बससेवा चालू नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

विध्यार्थ्यानी आपली समस्या मांडण्यासाठी शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांचे कार्यालय गाठले.

बससेवेसंदर्भात विध्यार्थ्यांना घेऊन आगार प्रमुखांशी चर्चा करून ही बससेवा सोमवार पासून चालू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

त्यामुळे विध्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

याप्रसंगी शिवसेनेचे तालूका प्रमुख वासुदेव चापले, शहर प्रमुख निलेश गंपावार, बबलु चव्हाण शहर समवयक,उपतालुकाप्रमुख रमेश झाडे, तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, गणेश चोथले आणि विध्यार्थी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *