११ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदबाबत महाविकास आघाडीने घेतली पत्रकारपरिषद, संजय राऊत म्हणाले…     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. या हिंचाराबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत खेद व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) महाविकासआघाडीच्या घटक पक्षांची पत्रकारपरिषद झाली. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या बंदमध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असून, हा बंद १०० टक्के यशस्वी होणार असल्याचे बोलून दाखवले. या पत्रकारपरिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची देखील उपस्थिती होती.

संजय राऊत म्हणाले, “केंद्र सरकार किंवा त्या संबंधित पक्षाच्या नसानसात अमानुषता भरलेली आहे आणि या विरोधात देशातील जनतेला जागं करण्यासाठी, शेतकरी एकाकी नाही आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, याची सुरूवात महाराष्ट्रामधून व्हावी, यासाठी महाविकासआघाडीने ११ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे. या बंदमध्ये तिन्ही पक्ष सहभागी होतील. स्वत: शरद पवार यांनी देखील काल सांगितलं आहे की बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत हे देशाला दाखवून द्यावं. दोन दिवसांपूर्वी मी दिल्लीत होतो. राहुल गां��

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *