शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये सर्व समाजघटकांनी सहभागी व्हावे                       

लोकदर्शन👉 मोहन भारती

 

*⭕शेतकरी विरोधी कायदे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय संदर्भात जागृती करावी, शांततेच्या मार्गाने बंद यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे*

*⭕ना अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन*

मुंबई (प्रतिनिधी): उत्तर प्रदेशमधील लखिंमपुर खेरी येथे न्याय्य मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून गाड्यांचा ताफा घालून त्यांची निघृन पणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध नोंदवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीच्या वतीने उद्या दिनांक ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यातील सर्व समाज घटकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

या संदर्भाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ना. अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने लादलेले शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करावेत म्हणून मागच्या अनेक महिन्यापासून देशातील शेतकरी आंदोलन करीत आहेत, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उत्तर प्रदेशातील लखिंमपुर खेरी येथे शेतकऱ्यांनी काढलेल्या रॅलीत गाड्यांचा ताफा घुसून शेतकऱ्यांना चिरडण्यात आले, यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. केंद्र शासनातील जबाबदार मंत्र्यांच्या नातेवाईकांनी हे अमानुष कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे, शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या व्यक्तींना त्वरित अटक करावी अशी मागणी करून आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अवैधरित्या थांबवून ठेवले, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्या पासून रोखणाऱ्या पोलिसानी अमानुष कृत्य करणाऱ्या लोकांना अटक करण्यासाठी तत्परता मात्र दाखवली नाही, शेतकऱ्यांचे आंदोलन दडपून टाकणाऱ्या या प्रवृत्तींचा निषेध नोंदवून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष व इतर मित्र पक्ष तसेच कामगार आणि शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या दिनांक ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, या बंदमध्ये लातूर, उस्मानाबाद, औरंगाबादसह मराठवाड्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व घटक सहभागी होतील ही अपेक्षा आहे, महा विकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या या बंदमध्ये सर्व समाज घटकांना सामावून घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, इतर मित्र पक्ष व शेतकरी , कामगार संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे व्हावे, कृषीप्रधान भारतातील अन्नदात्या शेतकऱ्यावर होणारा अन्याय जनतेला समजावून सांगावा शेतकरी विरोधी कायद्याबद्दल जनजागृती करावी असे आवाहनही ना.अमित देशमुख यांनी या निवेदनाद्वारे केली आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *